उमरखेडच्या खासगी बसला आर्णीजवळ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:40 IST2019-07-08T21:39:53+5:302019-07-08T21:40:07+5:30
यवतमाळ-उमरखेड मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा (एम.एच.२९-एम-८४५६) कोसदनी घाटात अपघात झाला.

उमरखेडच्या खासगी बसला आर्णीजवळ अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : यवतमाळ-उमरखेड मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा (एम.एच.२९-एम-८४५६) कोसदनी घाटात अपघात झाला. सोमवारी सकाळी घडलेल्या या अपघातात चालक आणि काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
सोमवारी सकाळी यवतमाळ येथून प्रवासी घेऊन आर्णी मार्गे उमरखेडकडे ही बस निघाली होती. दरम्यान लोणबेहळजवळ कोसदनी घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस झाडावर आदळली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.