उमरखेडचे जैन यांची मुंबईच्या रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:44 IST2019-01-14T21:44:29+5:302019-01-14T21:44:42+5:30
येथील युवा उद्योजक आणि ‘हृदयात समथींग समथींग’ चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार माणीकचंद जैन यांची रेल्वे मंत्रालयाने दुसऱ्यांदा क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता परामर्श समितीच्या सेंट्रल रेल्वे बोर्ड मुंबई पदावर नियुक्ती केली.

उमरखेडचे जैन यांची मुंबईच्या रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : येथील युवा उद्योजक आणि ‘हृदयात समथींग समथींग’ चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार माणीकचंद जैन यांची रेल्वे मंत्रालयाने दुसऱ्यांदा क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता परामर्श समितीच्या सेंट्रल रेल्वे बोर्ड मुंबई पदावर नियुक्ती केली.
या समितीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, मध्यप्रदेश तथा कर्नाटक आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, भुसावळ व नागपूर या पाच विभागांचा समावेश असून सोयींचा आढावा घेणे, कारवाईचे निर्देश देणे असे अधिकार समितीला आहे. जैन यांनी आपल्या निवडीचे श्रेय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, आमदार अॅड.नीलय नाईक, आमदार राजेंद्र नजरधने, नितीन भुतडा यांना दिले.