उमरखेडला रिव्हॉल्वर, घातक शस्त्रे जप्त

By Admin | Updated: November 11, 2016 02:06 IST2016-11-11T02:06:44+5:302016-11-11T02:06:44+5:30

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ पोलीस अधिकारी व १८० पोलीस कर्मचाऱ्यांनी उमरखेडमध्ये बुधवारी रात्री कोम्बींग आॅपरेशन राबविले.

Umarkhed seized a revolver, fatal weapons | उमरखेडला रिव्हॉल्वर, घातक शस्त्रे जप्त

उमरखेडला रिव्हॉल्वर, घातक शस्त्रे जप्त

कोम्बींग आॅपरेशन : तिघांना अटक
उमरखेड : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ पोलीस अधिकारी व १८० पोलीस कर्मचाऱ्यांनी उमरखेडमध्ये बुधवारी रात्री कोम्बींग आॅपरेशन राबविले. त्यात रिव्हॉल्वरसह घातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला.
गणेश विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीपासून उमरखेड सर्वत्र गाजते आहे. त्यातच दगडफेकीच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी थेट आत्महत्येचीच धमकी दिल्याने उमरखेडचे हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. तत्कालीन ठाणेदारावर निलंबनाची कारवाई करावी की करू नये, यावरून आयपीएसमध्ये एकमत न झाल्याने हा विषय गाजला. उमरखेडच्या याच प्रकरणात प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही म्हणून ‘मेमो’ दिला गेल्याने येथील दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकही उडाली होती, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Umarkhed seized a revolver, fatal weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.