शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडची शाळा आता भरणार कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 22:50 IST

महिनाभरापूर्वी झालेल्या वादळात येथील शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने आता शाळा भरणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देटिनपत्रे उडाली : महिना लोटूनही दुरुस्ती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : महिनाभरापूर्वी झालेल्या वादळात येथील शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. महिना लोटूनही अद्याप शाळेची दुरुस्ती झाली नसल्याने आता शाळा भरणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महिनाभरापूर्वी तालुक्याला वादळाचा तडाखा बसला. या तडाख्यात शहरातील मुलांच्या शासकीय माध्यमिक शाळेवरील टिनपत्रे उडून गेली. परिणामी शाळेच्या सर्व वर्गखोल्या छताविना उघड्या पडल्या. ही शाळा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अखत्यारीत येते. मात्र शाळा प्रशासनासह कुणालाच दुरुस्ती करण्यास सवड मिळाली नाही. आता शाळा सुरू होण्यास अवघा एक दिवस बाकी आहे. २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र छत नसलेल्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी बसणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.येत्या २६ जूनला शाळेचा पहिला ठोका पडणार आहे. तत्पूर्वी सर्व शाळांची दुरुस्ती केली जाते. शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेत पोहोचून मुख्याध्यापक, शिक्षक शाळांची दुरुस्ती करवून घेतात. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वच्छता केली जात आहे. शिक्षक शाळेची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहे. मात्र उमरखेडसारख्या शहरातील शाळेकडे शाळा प्रशासनासह जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीचेही दुर्लक्ष होत आहे. छतच नसल्याने पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी बसणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला.जेथे बसायचीच सोय नाही, त्या शाळेची गुणवत्ता कशी असेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तब्बल महिना लोटूनही शाळा प्रमुख व वरिष्ठांनी छत उडूनही आढावा घेतला नाही. छत अस्ताव्यस्त पडले आहे.

टॅग्स :SchoolशाळाRainपाऊस