ठाणेदाराचा कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम
By Admin | Updated: May 7, 2015 01:51 IST2015-05-07T01:51:38+5:302015-05-07T01:51:38+5:30
पोलीस ठाण्यातर्गंत अनेक गुन्ह्याचा तपास पेडींग आहे. त्यामुळे आठवडाभरात गुन्ह्याचा तपास लावा, ...

ठाणेदाराचा कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम
कळंब : पोलीस ठाण्यातर्गंत अनेक गुन्ह्याचा तपास पेडींग आहे. त्यामुळे आठवडाभरात गुन्ह्याचा तपास लावा, अन्यथा कारवाईसाठी तयार रहा, असा सज्जड दम कळंबचे ठाणेदार सूर्यकांत राऊत यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
कळंब शहरात सध्या भुरट्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. त्या पार्श्वभूमिवर ठाणेदारांनी कर्मचाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला. ज्या बिटमधील गुन्हे घडले, तेथील तपास निर्धारित वेळेत पूर्ण केला पाहीजे. पेंडिग गुन्ह्यांमुळे अतिरीक्त कामाचा ताण पडतो. वेळेच्या-वेळी गुन्ह्याचा तपास लावल्यास कामात सुसुत्रीपणा राहतो. परंतु काही कर्मचाऱ्यांकडे अनेक गुन्ह्यांचा तपास अजुनही प्रलंबित आहे. याचा जाब वरिष्ठांकडूनही विचारला जातो. त्यामुळे येणाऱ्या काळात गुन्ह्याचा तपास पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. जो कोणी स्वत:च्या कामात हयगय करेल, त्याची खैर केली जाणार नाही. कामात हयगय करणाऱ्यांचा कसुरी रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. सोबतच बीटची अदलाबदल हा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे. असेही ठाणेदार सूर्यकांत राऊत यांनी सर्वांना बजावले आहे.
शहरातील रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह
रात्रीच्या काळात होणाऱ्या घरफोड्यांमुळे कळंबचे नागरिक चांगलेच दहशतीत आहे. कुलूप लावलेले घर फोडण्याकडे चोरट्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे कामानिमीत्त बाहेरगावी जावे, की नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांपुढे आहे. परिणाणी वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. विशेष म्हणजे एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. या ठिकाणी नव्याने ठाणेदार म्हणून सूर्र्यकांत राऊत यांनी सूत्रे स्वीकारली. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदार येण्यासाठी थोडा कालावधी लागणार असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जाते. ठाणेदाराच्या मवाळ भुमिकेचा काही पोलीस कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे ठाणेदारांनी आपल्या अधिकारातर्गंत कारभार सुरळीत करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)