अखेर गिरजाबाईला मिळाला मदतीचा हात
By Admin | Updated: February 9, 2016 02:13 IST2016-02-09T02:13:10+5:302016-02-09T02:13:10+5:30
तालुक्यातील लोणी घाटाणा येथील निराधार, वयोवृद्ध व आजारी असलेल्या गिरजाबार्इंचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले.

अखेर गिरजाबाईला मिळाला मदतीचा हात
दखल : श्रावणबाळ योजनेचाही लाभ
यवतमाळ : तालुक्यातील लोणी घाटाणा येथील निराधार, वयोवृद्ध व आजारी असलेल्या गिरजाबार्इंचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची यवतमाळ तहसील कार्यालयाने तातडीने दखल घेऊन तिला श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला.
यवतमाळ तालुक्यातील लोणी घाटाणा येथील गिरजाबाई मदतीसाठी वनवन भटकत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी तातडीने तहसील कार्यालय कामाला लागले. तलाठी संघटनेने गिरजाबार्इंना शोधून तहसील कार्यालयात आणले. त्याठिकाणी स्वत: तहसीलदार सचिन शेजाळ, तलाठी संघटनेचे अध्यक्ष के.व्ही. दांडेकर, रंगारी व इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गिरजाबाईला साडीचोळी व आवश्यक मदत देण्यात आली. तसेच कागदपत्रांची पूर्तता करून श्रावणबाळ योजनेत समावेश करून घेण्यात आला. त्यामुळे दर महिन्याला ६०० रुपये गिरजाबाईला मिळणार असल्याचे तहसीलदारांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)