बायपासवर ट्रेलरखाली चिरडून दोन तरुण ठार

By Admin | Updated: July 14, 2014 01:36 IST2014-07-14T01:36:29+5:302014-07-14T01:36:29+5:30

भरधाव दुचाकी स्लीप होवून ट्रेलरखाली

Two young people killed in a trap by trapping a trailer under a trailer | बायपासवर ट्रेलरखाली चिरडून दोन तरुण ठार

बायपासवर ट्रेलरखाली चिरडून दोन तरुण ठार

यवतमाळ : भरधाव दुचाकी स्लीप होवून ट्रेलरखाली आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना येथील धामणगाव-नागपूर बायपासवर रविवारी सकाळी ९ वाजता घडली. घटनास्थळावर रक्तामांसाचा सडा अपघाताची भीषणता दर्शवित होता.
विष्णू गुलाब भोसेकर (३०) रा. कार्ली पोड आणि सचिन मधुकर बोरकर (२६) रा. कळंब माथा अशी मृतांची नावे आहेत. रविवारी सकाळी विष्णू आणि सचिन हे दोघे नातेवाईक तरूण दुचाकीने (क्र. एमएच ३०- वाय- ७२१) धामणगावकडे जात होते. दरम्यान धामणगाव-नागपूर बायपास चौफूलीवर त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्याच वेळी जात असलेल्या भरधाव ट्रेलर (एमएच ४० - वाय ८४९१) खाली आली. त्यामुळे ट्रेलरच्या मागील चाकात चिरडून विष्णू आणि सचिन जागीच ठार झाले. यावेळी घटनास्थळी रक्त आणि मासांचा अक्षरक्ष: सडा पडून होता.
त्यामुळे काहीकाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रशेखर कडू यांनी पथकासह तेथे धाव घेतली.
पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर अपघातात चुराडा झालेली दुचाकी आणि ट्रेलरही ताब्यात घेतला. तसेच गुन्हाही दाखल केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Two young people killed in a trap by trapping a trailer under a trailer