वर्धा नदीत दोन तरुण बेपत्ता
By Admin | Updated: October 9, 2015 00:11 IST2015-10-09T00:11:43+5:302015-10-09T00:11:43+5:30
वर्धा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोन जण बेपत्ता झाल्याची घटना वणी तालुक्यातील शेलू खुर्द नदीपात्रात घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या दोघांचा थांगपत्ता लागला नव्हता.

वर्धा नदीत दोन तरुण बेपत्ता
शोध सुरू : मासेमारीसाठी गेले होते नदीवर
नांदेपेरा : वर्धा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी दोन जण बेपत्ता झाल्याची घटना वणी तालुक्यातील शेलू खुर्द नदीपात्रात घडली. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही या दोघांचा थांगपत्ता लागला नव्हता.
वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथील शिवराज मुन्ना परसराम (२९) त्याचा मोठा भाऊ भोला मुन्ना परशराम (३२) आणि बाबू मनोज परशराम (२७) हे तीन तरुण गुरुवारी दुपारी ४ वाजता शेलू खुर्द येथील वर्धा नदीच्या पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. हे तिघेही मासेमारी करण्यासाठी नदी पात्रात उतरले. मात्र त्यावेळी तिघेही पाण्यात गटांगळ्या खावू लागले. तिघेही नदीच्या प्रवाहात वाहू लागले. शिवराज परशराम हा तरुण कसाबास नदीच्या पात्रातून बाहेर पडला. मात्र भोला आणि बाबू हे दोघेही नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाले.
घाबरलेल्या शिवराजने ही माहिती शेलू येथील नागरिकांना दिली. त्यावेळी शेलू, राजूर, नांदेपेरा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या तरुणांचा शोध सुरू ेकेला. दरम्यान तहसीलदार रणजित भोसले, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सायरे, मंडळ अधिकारी जयंत झाडे, तलाठी प्राजक्ता केदार हेही शेलू खुर्द येथे पोहोचले.
सायंकाळपर्यंत या दोघांचा शोध सुरू होता. मात्र थांगपत्ता लागत नव्हता. रात्री अंधार झाल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी हे तिघे तरुण मासेमारी करण्यासाठी उतरले त्या ठिकाणी नदीचे पात्र २५ ते ३० फूट खोल असल्याने शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता. या घटनेची माहिती राजूर कॉलरी येथे पोहोचताच गावात एकच खळबळ उडाली. (वार्ताहर)