विनयभंग प्रकरणात दोन वर्षांचा सश्रम कारावास
By Admin | Updated: July 6, 2016 02:47 IST2016-07-06T02:47:18+5:302016-07-06T02:47:18+5:30
एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.

विनयभंग प्रकरणात दोन वर्षांचा सश्रम कारावास
गणोरीची घटना : जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
यवतमाळ : एका मुलीच्या विनयभंग प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा मंगळवारी ठोठावली.
फकीरजी भितकर (५२) रा. गणोरी ता. बाभूळगाव असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. फकीरजी हा एका मुलीला त्रस्त करून सोडत होता. १३ सप्टेंबर २०१३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता गणोरी येथे सदर मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी सदर मुलीने बाभूळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तपास करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी आले. या वेळी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आरोपी फकीरजी भितकर याला दोन वर्ष सश्रम कारावास आणि दोन हजार ५०० रुपये दंड सुनावण्यात आला. या प्रकरणी सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील अॅड. अरुण मोहोड यांनी मांडली.