पॉलिशच्या नावाखाली दोन महिलांना लुटले

By Admin | Updated: August 24, 2016 00:51 IST2016-08-24T00:51:05+5:302016-08-24T00:51:05+5:30

भांड्यांना घरच्याघरी पॉलिश करण्याचे आमिष देऊन दोन महिलांंना दोन भामट्यांनी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना कळंब तालुक्यातील

Two women have been robbed in the name of polishing | पॉलिशच्या नावाखाली दोन महिलांना लुटले

पॉलिशच्या नावाखाली दोन महिलांना लुटले


कळंब : भांड्यांना घरच्याघरी पॉलिश करण्याचे आमिष देऊन दोन महिलांंना दोन भामट्यांनी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना कळंब तालुक्यातील गलमगाव येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी कळंब पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
गलमगाव येथे सारिका प्रशांत तेलंग व वर्षा सुनील तेलंग या दोघी जावा घरकाम करीत होत्या. मंगळवारी दुपारच्या दरम्यान गावात काळ्या रंगाची दुचाकी घेऊन दोघे जण त्यांच्या घरी आले. तांबा व पितळीच्या भांड्यांना चकाकी आणून देतो, असे सांगत त्यांच्याशी ओळख निर्माण केली. त्यांनतर अचानकपणे बोलता-बोलता दोघींच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. या दागिन्याची किंमत २५ हजार रुपये आहे. घरातच दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे भीतीचे वातावरण आहे. कळंब पोलिसांनी या चोरट्यांचा शोध जारी केला आहे.
दागिणे चमकविण्याच्या नावाखाली जिल्ह्यात यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. दुपारच्या वेळी घरी पुरुष मंडळी नसताना हे भामटे महिलांंना गाठून आपले काम फत्ते करतात. भोळ्याभाबड्या महिला याला बळी पडतात.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two women have been robbed in the name of polishing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.