दुचाकीला ट्रकची धडक, दोन गंभीर

By Admin | Updated: March 22, 2015 01:58 IST2015-03-22T01:58:59+5:302015-03-22T01:58:59+5:30

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

Two wheelers hit two trucks | दुचाकीला ट्रकची धडक, दोन गंभीर

दुचाकीला ट्रकची धडक, दोन गंभीर

पांढरकवडा : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना केळापूर येथील बस स्थानकाजवळ शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली.
अवि विजय पाटील व रोशन बोधनवार दोघेही रा.पांढरकवडा असे जखमींची नावे आहे. दोघेही दुचाकीने रूढा येथून पांढरकवडाकडे येत होते. दरम्यान केळापूर येथे समोरून येणारा आयचर ट्रक एम.एच.३१-डब्ल्यू. ८७७७ याने दुचाकीला धडक दिली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना येथून पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविले.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Two wheelers hit two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.