मेटीखेडा मार्गावर दुचाकीची धडक, तीन जण जखमी
By Admin | Updated: July 22, 2015 00:21 IST2015-07-22T00:21:40+5:302015-07-22T00:21:40+5:30
परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीची धडक होवून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले.

मेटीखेडा मार्गावर दुचाकीची धडक, तीन जण जखमी
डोंगरखर्डा : परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीची धडक होवून झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. ही घटना राळेगाव-मेटीखेडा मार्गावरील कैलास पोड येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली.
आशिष कुबडे, सीमा कुबडे (डोंगरखर्डा), अशोक कुळसंगे (रा.पहूर इजारा) अशी जखमींची नावे आहेत. आशिष कुबडे हा एम.एच.२९/डब्ल्यू.-१२९९ या मोटरसायकलने तेरवीचा कार्यक्रम आटोपून डोंगरखर्डा येथे येत होता. अशोक कुळसंगे हा अंत्यविधी आटोपून राळेगावकडे जात होता. दरम्यान, या दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला.
आशिष व प्रकाश यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सीमा कुबडे हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आशिषचा मुलगा देवांशू याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेचा पुढील तपास जमादार विजय मगर करत आहे. (वार्ताहर)