शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

हर्षीनजीक वळणावर त्याच्या भरधाव दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

ठळक मुद्देपुसदची घटना : घराचा आधार हिरावला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : भरधाव मोटरसायकलला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजता हर्षीनजीक मोठ्या हनुमानाजवळ घडली.प्रकाश देवराव मोरे (३०) रा. नागवाडी ता. पुसद असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील नागवाडी येथील रहिवासी प्रकाश देवराव मोरे हा पुसदच्या फुपाटे हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून कार्यरत होता. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास प्रकाश आपल्या दुचाकीने नागवाडीवरून पुसदकडे ड्युटीसाठी निघाला होता. मात्र हर्षीनजीक वळणावर त्याच्या भरधाव दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नागवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ. हरिभाऊ फुपाटे, डॉ. आरती फुपाटे, भाऊ चौरे उपस्थित होते.मनमिळावू स्वभावाच्या प्रकाशच्या निधनाने नागवाडीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. प्रकाश हा कुटुंबीयांचा आधार होता. त्याच्या निधनाने मोरे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू