शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन ट्रकची समोरासमोर धडक, दाेन ठार, अपघातात ३०० बकऱ्यांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:33 IST

Yavatmal : यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ अपघात

वणी (यवतमाळ) : यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास परस्पर विरूद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकची टक्कर झाली.  या भीषण अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झालेत. अपघातातील मृत व जखमींची अद्याप ओळख पटली नाही.  

या अपघातात ट्रकमधील   ३०० बकऱ्यासुध्दा ठार झाल्यात. चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेल्या एमएच ४० एम२८५८ क्रमांकाचा ट्रक आणि मध्यप्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला एमएम ४० सीटी ५५५८ क्रमांकाचा ट्रक, या दोन ट्रकमध्ये समोरासमोर टक्कर झाली.   अपघातात ट्रकमधील दोनजण जागीच ठार झाले तर ट्रकमधी सुमारे ३०० बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.

जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. जखमींना तातडीने उपचारार्थ दवाखान्यात रवाना करण्यात आले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी मरण  पावलेल्या बकऱ्यांचा मोठा खच पडून  आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातYavatmalयवतमाळDeathमृत्यू