यवतमाळ जिल्ह्यात दोघांनी विष घेतले, एकाने लावला गळफास
By विलास गावंडे | Updated: September 4, 2023 21:00 IST2023-09-04T21:00:44+5:302023-09-04T21:00:57+5:30
नेर / वडकी ( यवतमाळ ) : जिल्ह्यात तीन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन घटना नेर तालुक्यातील व ...

यवतमाळ जिल्ह्यात दोघांनी विष घेतले, एकाने लावला गळफास
नेर / वडकी (यवतमाळ) : जिल्ह्यात तीन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन घटना नेर तालुक्यातील व एक राळेगाव तालुक्यातील आहे. दोघांनी विषारी औषध घेऊन, तर एकाने गळफास लावून आत्महत्या केली.
नेर तालुक्यातील चिचगाव येथे आकाश आनंद कुमरे (२५) याने जनावरांच्या गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी रात्री कुटुंबातील सदस्य झोपी गेले असताना त्याने नायलॉन दोरीने गळफास लावला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, वहिणी व मोठा आप्त परिवार आहे. घटनेची तक्रार त्याचा भाऊ रवींद्र याने केली. यानुसार नेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
याच तालुक्यातील दुसरी घटना घारेफळ येथे सोमवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली. या गावातील एका शेतमजुराने गळफास लावून आत्महत्या केली. दिनेश बाबूलाल जाधव (३२) असे मृताचे नाव आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधत त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. या घटनेचा तपास योगेश सलामे, जमादार पवार करीत आहे.
वडकी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या विहिरगाव (ता.राळेगाव) येथील युवकाने विषारी औषध प्राशन करून मृत्यूला कवटाळले. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. वैभव देवराव लुंगसे (१९) रा. विहिरगाव, असे मृताचे नाव आहे. त्याने स्वत:च्या शेतात विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच त्याला करंजी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.