शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुकनेगावच्या जंगलात भुकेने व्याकूळ दोन बछड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 20:00 IST

वनविभागात खळबळ : बेपत्ता वाघिणीचा पथकांकडून शोध

संतोष कुंडकर/वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील सुकनेगावलगतच्या जंगलात एका तलावाकाठी वाघिणीच्या दोन बछड्यांचा लागोपाठ मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. यापैकी बुधवारी एकाचा, तर गुरुवारी दुसऱ्या बछड्याचा मृत्यू झाला. या बछड्यांची आई असलेली वाघिण बेपत्ता असून वन विभागाची पाच पथके तिचा शोध घेत आहेत. भुकेने व्याकूळ झाल्याने या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला.वणी तालुक्यातील सुकनेगाव परिसरात महसूलचे जंगल आहे.

या जंगलात एक छोटेखानी तलाव आहे. या तलावाजवळ बुधवारी सकाळी एक मादी बछडा मृतावस्थेत आढळून आला. मंदर येथील नर्सरीत या बछड्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच, गुरुवारी सकाळी याच तलावाच्या परिसरात पुन्हा एका मादी बछड्याचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी या बछड्याला गोरेवाडा (नागपूर) येथे रवाना केले. दरम्यान, या घटनेनंतर गुरुवारी सीसीएफ वसंत घुले, डीएफओ किरण जगताप, प्रभारी सहायक वनसंरक्षक शंकर हटकर, वणीचे आरएफओ प्रभाकर सोनटक्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वाघिणीच्या शोधासाठी पाच पथकेदोन दिवसांपासून वाघिण या बछड्यांपासून दूर गेली आहे. या बछड्यांचे वय दोन ते तीन महिने इतके असल्याने वाघिणीच्या दुधावरच त्यांचे पोषण सुरू होते. मात्र वाघिण दूर निघून गेल्याने या बछड्यांना दूध मिळाले नाही, परिणामी त्यांचा भूकेमुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या वाघिणीला शोधण्यासाठी वन विभागाची पाच पथके घटनेनंतर संपूर्ण जंगल पिंजून काढत आहेत. मात्र, कुठेही वाघिणीच्या पायाचे ठसे आढळून आले नाहीत.

दोन्ही बछड्यांचे वय अगदी लहान असल्याने ते शिकार करू शकत नव्हते. वाघिणीच्या दुधावरच त्यांची भूक भागत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीपासून हे बछडे दुरावले. भूकने व्याकूळ होऊनच त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज आहे. वाघिणीच्या हालचाली टिपण्यासाठी परिसरात १० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.- प्रभाकर सोनडवले, आरएफओ, वणी.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यूYavatmalयवतमाळ