शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

दिग्रसजवळ दोन अपघातात दोन ठार, सहा जखमी

By admin | Updated: November 3, 2015 02:58 IST

तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. दिग्रसपासून पाच किलोमीटर अंतरावरील

दिग्रस : तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. दिग्रसपासून पाच किलोमीटर अंतरावरील सावळी शिवारात दोन उभ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. तर सावंगा बु. जवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर उटल्याने मजूर ठार झाला. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील काही युवक दुचाकीने दिग्रसकडे रविवारी रात्री ८ वाजता येत होते. त्यातील एका तरुणाची दुचाकी बंद पडली. त्याने ही दुचाकी सावळी फाट्याजवळ उभी केली. दरम्यान त्याचा सहकारी मित्रही दुचाकी घेऊन तेथे थांबला. याचवेळी कापसाने भरलेला ट्रक एम.एच.०४-बी.जी.-८६७८ दिग्रसकडे जात होता. चालकाचे नियंत्रण गेल्याने या ट्रकने दोनही दुचाकींना चिरडले. त्यात सुमीत अनिल जयस्वाल (२०) रा. बोरगाव मंजू (जि.अकोला) हा जागीच ठार झाला. तर सतीश हरसुले (२२), राजू जयस्वाल (१८), शुभम हरसुले (२३), आशिष जयस्वाल (२३) व अमोल जयस्वाल (२५) सर्व रा. पोहरादेवी अशी जखमींची नावे आहे. सुमित हा पोहरादेवी येथे आपल्या मामाकडे आला होता. मात्र अपघातात त्याचा मृत्यू झाला.दुसरी घटना आर्णी मार्गावरील सावंगा बु. जवळ रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. लाकडे घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने तसलीम जुम्मा खल्ली (३७) रा. गवळीपुरा दिग्रस हा ठार झाला. तर रमजान अन्नू पप्पुवाले (३५) आणि रमजान भग्गू मिरावाले (४५) रा. दिग्रस हे जखमी झाले. ट्रॅक्टरमधील लाकडे अंगावर पडल्याने तसलीमचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)