दिग्रसजवळ दोन अपघातात दोन ठार, सहा जखमी
By Admin | Updated: November 3, 2015 02:58 IST2015-11-03T02:58:04+5:302015-11-03T02:58:04+5:30
तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. दिग्रसपासून पाच किलोमीटर अंतरावरील

दिग्रसजवळ दोन अपघातात दोन ठार, सहा जखमी
दिग्रस : तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाले. दिग्रसपासून पाच किलोमीटर अंतरावरील सावळी शिवारात दोन उभ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. तर सावंगा बु. जवळ लाकडाने भरलेला ट्रॅक्टर उटल्याने मजूर ठार झाला.
मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील काही युवक दुचाकीने दिग्रसकडे रविवारी रात्री ८ वाजता येत होते. त्यातील एका तरुणाची दुचाकी बंद पडली. त्याने ही दुचाकी सावळी फाट्याजवळ उभी केली. दरम्यान त्याचा सहकारी मित्रही दुचाकी घेऊन तेथे थांबला. याचवेळी कापसाने भरलेला ट्रक एम.एच.०४-बी.जी.-८६७८ दिग्रसकडे जात होता. चालकाचे नियंत्रण गेल्याने या ट्रकने दोनही दुचाकींना चिरडले. त्यात सुमीत अनिल जयस्वाल (२०) रा. बोरगाव मंजू (जि.अकोला) हा जागीच ठार झाला. तर सतीश हरसुले (२२), राजू जयस्वाल (१८), शुभम हरसुले (२३), आशिष जयस्वाल (२३) व अमोल जयस्वाल (२५) सर्व रा. पोहरादेवी अशी जखमींची नावे आहे. सुमित हा पोहरादेवी येथे आपल्या मामाकडे आला होता. मात्र अपघातात त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना आर्णी मार्गावरील सावंगा बु. जवळ रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. लाकडे घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने तसलीम जुम्मा खल्ली (३७) रा. गवळीपुरा दिग्रस हा ठार झाला. तर रमजान अन्नू पप्पुवाले (३५) आणि रमजान भग्गू मिरावाले (४५) रा. दिग्रस हे जखमी झाले. ट्रॅक्टरमधील लाकडे अंगावर पडल्याने तसलीमचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)