घाटंजी तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:32 IST2018-12-25T22:32:36+5:302018-12-25T22:32:49+5:30

तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली. तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

Two Marriage Suicides in Ghatanji Taluka | घाटंजी तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या

घाटंजी तालुक्यात दोन विवाहितांची आत्महत्या

ठळक मुद्देशिवणी, सायतखर्डा : विहिरीत घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील शिवणी व सायतखर्डा येथील दोन विवाहितांनी आत्महत्या केली.
तालुक्यातील शिवणी येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. शिवबाई रूपेश नांदेकर (२०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. हुंड्यासाठी तिला सासरी मारहाण होत होती. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार महादेव कलपे यांनी दिली. त्यावरून पोलिसांनी रूपेश नांदेकर (३०) व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत सायतखर्डा येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. पुष्पा गणेश मांदाडे (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळले नाही. पारवा पोलीस पुढील तपास करीत आहे.

Web Title: Two Marriage Suicides in Ghatanji Taluka