पुसद येथे पावणे दोन लाखांची घरफोडी
By Admin | Updated: February 23, 2016 02:51 IST2016-02-23T02:51:30+5:302016-02-23T02:51:30+5:30
चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री

पुसद येथे पावणे दोन लाखांची घरफोडी
पुसद : चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना रविवारी रात्री येथील देवी वार्डात घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दिशांत तुळशीदास जोगे यांच्या घरी ही चोरी झाली. त्यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडल्यानंतर दाराचा कोंडा तोडून चोरटे आत शिरले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख २० हजार रुपये असा १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. या घटनेची तक्रार रविवारी सायंकाळी जोगे यांनी पुसद पोलिसात दिली. यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुसद शहरात चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी रात्री सप्तगिरीनगरातील सुनील कनवाडे यांच्या घरातून सुमारे ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. या घटनेहून २४ तासही लोटत नाही तोच देवी वार्डात चोरी झाली. मागील काही महिन्यांपासून चोरट्यांनी बंद घरे आपले लक्ष्य केले आहे. (प्रतिनिधी)