गोधनी रोडवर फ्लॅटमध्ये दोन लाखांची घरफोडी
By Admin | Updated: June 21, 2017 00:12 IST2017-06-21T00:12:44+5:302017-06-21T00:12:44+5:30
अमोलकचंद महाविद्यालयातील सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक गुरुविंदरसिंग फ्लोरा यांच्या गोदनी रोड स्थित गुरुनानक अपार्टमेंटमधील

गोधनी रोडवर फ्लॅटमध्ये दोन लाखांची घरफोडी
भरदिवसाची घटना : निवृत्त क्रीडा प्राध्यापक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमोलकचंद महाविद्यालयातील सेवानिवृत्त क्रीडा प्राध्यापक गुरुविंदरसिंग फ्लोरा यांच्या गोदनी रोड स्थित गुरुनानक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये मंगळवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घटनेच्यावेळी फ्लोरा कुटुंबिय एका लग्न समारंभासाठी गेले होते.
दुपारी १ वाजतानंतर चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या बाजूच्या घराचे दार बाहेरून बंद करून फ्लोरा यांच्या घरातील आलमारीत ठेवलेले ७० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. दुपारी २ वाजता शेजारच्या मुलीला फ्लोरा यांच्या घराचे कु लूप आढळल्याने तिने याची माहिती फ्लोरा कुटुंबियांना दिली. लगेच फ्लोरा कुटुंबीय घरी परतले. सोन्याच्या दागिन्यांव्यतिरिक्त चोरट्याने कोणत्याच वस्तूला हात लावला नसल्याचे त्यांना दिसून आले.
चोरट्याने डुप्लीकेट चावीचा वापर करून कुलूप उघडल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे परिचित व्यक्तीनेच चोरी केल्याची शंका बळावली आहे.