दोन अपघातात दोन ठार

By Admin | Updated: April 26, 2016 01:55 IST2016-04-26T01:55:12+5:302016-04-26T01:55:12+5:30

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तरुण जागीच ठार झाला. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा

Two killed in two accidents | दोन अपघातात दोन ठार

दोन अपघातात दोन ठार

यवतमाळ : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह तरुण जागीच ठार झाला. यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ कारने दुचाकीला धडक दिली. त्यात तरुण जागीच ठार झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी कार पेटवून दिली. तर दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील जेवली येथे घडली. ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. तिचा चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला.
यवतमाळ-दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीजवळ सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भरधाव कारची दुचाकीला धडक लागली. यात दयाराम किसन राठोड (३८) रा. तिवसा ता. यवतमाळ हा जागीच ठार झाला. तर अनिल शंकर पवार (३५) रा. तिवसा हा गंभीर जखमी झाला. हे दोघे दुचाकी एम.एच.२९-एयू-७३४५ ने सोमवारी सकाळी ८.३० वाजता यवतमाळकडे येत होते. त्याच वेळी यवतमाळकडून दारव्ह्याकडे जाणाऱ्या वॅगनआर कार (एम.एच.२९-आर-२४९७) ने जबर धडक दिली. त्यात दयाराम जागीच ठार झाला. तर अनिलला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातस्थळी उभ्या असलेल्या कारला अज्ञात इसमांनी आग लावून दिली. यात कार पूर्णत: जळून भस्मसात झाली. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड आणि दारव्हा येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. सदर कार आनंद पुंडलिक मराडे रा. बालाजी सोसायटी यवतमाळ यांच्या मालकीची असून चालक विजय धनसिंग राठोड रा. लोहारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना उमरखेड तालुक्यातील जेवली येथे सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात तिचा चार वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. सुनीता रामदास येरवाड (२५) रा. बोदडी ता. किनवट असे मृत महिलेचे नाव आहे. तर संदीप रामदास येरवाड (४) असे जखमी मुलाचे नाव आहे.
सुनीताच्या बहिणीकडे मंगळवारी लग्न असल्याने सुनीता आपल्या पुतण्यासोबत दुचाकीने जेवलीनजीकच्या मथुरानगर तांडा येथे येत होती. गावाजवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात सुनीता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकात आली आणि जागीच ठार झाली. तर तिचा मुलगा संदीप याच्या दोनही पायाला जबर दुखापत झाली. पुतण्या या अपघातात सुर्दैवाने बचावला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बिटरगाव पोलिसांनी या अपघाताची नोंद घेतली.

Web Title: Two killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.