ट्रॅव्हल्स अपघातात दोन ठार
By Admin | Updated: April 4, 2015 01:33 IST2015-04-04T01:33:37+5:302015-04-04T01:33:37+5:30
भरधाव ट्रॅव्हल्स निंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर काही प्रवासी किरकोळ जखमी

ट्रॅव्हल्स अपघातात दोन ठार
जामवाडीजवळील घटना : अनेक प्रवासी किरकोळ जखमी
सोनखास : भरधाव ट्रॅव्हल्स निंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील जामवाडी गावाजवळ शुक्रवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास घडली.
सय्यद अज्जू सय्यद गयासुद्दीन (३७) रा. दिग्रस आणि सुभाष भीका जाधव (४२) रा. कुंभारकिन्ही ता. दारव्हा असे मृत तरुणाचे नाव आहे. पुसदवरून ट्रॅव्हल्स एम.एच.१४-एबी-८४५७ नागपूरकडे जात होती. यामध्ये काही प्रवासी बसले होते. दारव्हा तालुक्यातील जामवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रॅव्हल्स रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडावर आदळली. यात सुभाष व सय्यद अज्जू जागीच ठार झाले. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
सय्यद अज्जू हा दिग्रस येथील ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करीत होता.
या प्रकरणी शेख मजहर शेख यासीन रा. पुसद यांनी लाडखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तर किरकोळ जखमींवर यवतमाळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)
गावकरी मदतीला
पहाटे १.३० वाजताच्या सुमारास प्रवाशांचा एकच कोलाहल जामवाडीतील नागरिकांनी ऐकला. काहीतरी विपरीत घडल्याचे लक्षात येताच अनेकांनी धाव घेतली. ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याचे लक्षात येताच. तत्काळ जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तत्काळ वाहनाची व्यवस्था करून त्यांना यवतमाळच्या रुग्णालयात पाठविण्यासाठी जामवाडीच्या नागरिकांनी मदत केली.