बोलेरो झाडावर आदळून दोन ठार
By Admin | Updated: May 15, 2015 02:15 IST2015-05-15T02:15:03+5:302015-05-15T02:15:03+5:30
भरधाव बोलेरो मालवाहू जीप निंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात आंबे व्यापाऱ्यासह चालक जागीच ठार झाला.

बोलेरो झाडावर आदळून दोन ठार
रुंझाची घटना : आंबा व्यापाऱ्याचा समावेश
रुंझा : भरधाव बोलेरो मालवाहू जीप निंबाच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात आंबे व्यापाऱ्यासह चालक जागीच ठार झाला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील रुंझा ते पाथरी रस्त्यावर गुरुवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
सागर भीमराव सायगम (२५) रा. भोसा रोड यवतमाळ आणि म.अन्सार म. हनीफ (२५) रा. चामोर्शी जि. गडचिरोली अशी मृतांची नावे आहे. गडचिरोलीवरून लोणच्याचे आंबे घेऊन बोलेरो मालवाहू जीप क्र. एम.एच.२९-टी-५५४० यवतमाळकडे येत होती. रुंझा ते पाथरी दरम्यान चालकाचे नियंत्रण गेल्याने गुरुवारी पहाटे बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, चालक सागर आणि आंबे व्यापारी म. अन्सार जागीच ठार झाले. अपघाताचा हा प्रकार दिवस उजाडल्यानंतर नागरिकांच्या लक्षात आला. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पांढरकवडा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)