वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित

By Admin | Updated: July 23, 2015 02:26 IST2015-07-23T02:26:10+5:302015-07-23T02:26:10+5:30

खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शारदा चौकातील जुगारावर धाड घातल्या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या दोन बीट जमादारांना बुधवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले.

Two jamadars suspended for Vadgaon Road | वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित

वडगाव रोडचे दोन जमादार निलंबित

एसपींची कारवाई : जुगारावरील धाड
यवतमाळ : खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शारदा चौकातील जुगारावर धाड घातल्या प्रकरणी वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या दोन बीट जमादारांना बुधवारी सायंकाळी निलंबित करण्यात आले.
दीपक वानोळे व टिकाराम राठोड अशी या जमादारांची नावे आहेत. गेल्या आठवड्यात एसपींनी स्वत: धाड घालून पोलीस चौकीच्या मागे चालणारा हा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर जमादारापासून एसडीपीओपर्यंत सर्वच संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या. त्यातील दोन जमादारांच्या निलंबनाचे आदेश जारी केले गेले. या जमादारांसोबत सहायक पोलीस निरीक्षकाच्या निलंबनाचाही प्रस्ताव होता. मात्र ऐनवेळी हा प्रस्ताव मागे घेतला गेल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते.
जमादारांच्या निलंबनानंतर आता वडगाव रोड ठाणेदारावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. जमादाराच्या निलंबनानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळत आहे. ठाणेदाराच्या ‘ग्रीन सिग्नल’शिवाय कर्मचारी अवैध धंद्यांकडे डोळेझाक करू शकतात काय असा कळीचा मुद्दा कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Two jamadars suspended for Vadgaon Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.