पाचधारा यात्रेत दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: March 9, 2016 00:05 IST2016-03-09T00:05:38+5:302016-03-09T00:05:38+5:30
महाशिवरात्रीनिमित्त शहरालगतच्या पाचधरा येथील यात्रेत तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने दोन गटांत तुफान हाणामारी झाली.

पाचधारा यात्रेत दोन गटांत हाणामारी
हुल्लडबाजीवरून वाद : वर्धेच्या सहा तरुणांना अटक
यवतमाळ : महाशिवरात्रीनिमित्त शहरालगतच्या पाचधरा येथील यात्रेत तरुणांनी हुल्लडबाजी केल्याने दोन गटांत तुफान हाणामारी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून यवतमाळ शहर पोलिसांनी वर्धेच्या सहा तरुणांना अटक केली.
यवतमाळातील पाटीपुरा परिसरातील विशाल अरुण मुंगले हा महाशिवरात्रीनिमित्त आपल्या परिवारासह पाचधरा येथे दर्शनासाठी गेला होता. टेकडीवर चढत असताना काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता विशालला त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती विशालने आपल्या मित्रांना दिली. त्यानंतर विशालच्या मित्रांनी तेथे पोहोचून वर्धेच्या तरुणांंना जाब विचारला. त्यावरून वाद होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणी सुरज धनराज पाहुणे (२७) रा. एसटी डेपोजवळ वर्धा याने शहर ठाण्यात मारहाणीची तक्रार दिली. तसेच विशाल अरुण मुंगले यानेसुद्धा सहा तरुणांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने वर्धा येथील विकास मारोतराव पाठणकर, सुरज घनशाम पाहुणे, अभिलाष गणेश काळे, अनिकेत देवराव रेवतकर, प्रवीण श्रावण गिरपुंजे, महेश धनराज पाहुणे या सहा जणांना अटक केली. तसेच विशाल मुंगलेसह अज्ञात दहा जणाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)