पुसद शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

By Admin | Updated: July 4, 2016 02:11 IST2016-07-04T02:11:33+5:302016-07-04T02:11:33+5:30

पुसद शरासह तालुक्यात दुचाकी चोरून उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

Two gangs of two-wheeler gangs in the town of Pausal | पुसद शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

पुसद शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

तिघांना अटक : अनेक चोरींचा छडा लागणार
पुसद : पुसद शरासह तालुक्यात दुचाकी चोरून उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पुसद पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
पुसद शहरात गत काही दिवसांपासून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास होत होत्या. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी गुप्त माहिती मिळविणे सुरू केले. ठाणेदार गजानन शेळके यांनी एक विशेष पथक तयार केले या पथकात जमादार वसंत चव्हाण, मुन्ना आडे, माधव आत्राम, महंमद गदर शेख, प्रसन्नजित भवरे, अभिषेक इंगळे यांचा समावेश आहे. या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून टोळी गजाआड केली. त्यात पांडुरंग अमृतराव श्रीनाथ (२२) रा. भगतसिंग वार्ड उमरखेड, शेख फिरोज उर्फ पटेल शेख मुस्तफा (३०) रा. रहीमनगर उमरखेड, शेख वसीम शेख अमजदतुल्ला (३२) रा. आझाद चौक हदगाव जि. नांदेड यांना अटक केली.
या चोरट्यांनी पुसद शहर, वसंतनगर, दिग्रस, कळमनुरी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीची असल्याचा सुगावा लागू नये म्हणून नंबर प्लेट बदलविण्यात आली होती. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

पोलिसांनी जप्त केल्या पाच दुचाकी
पोलिसांनी चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त केल्या. त्यात पुसद येथील मोतीनगरातील प्रतीक सुरेश मांडवगडे यांची दुचाकी क्र.एम.एच.२९-एएफ-६१५, निलेश विठ्ठलराव वासकर रा. विठ्ठलनगर दिग्रस यांची दुचाकी क्र. एम.एच.२९-एएफ-८९१, शेख चाँद शेख सुलेमान रा. मोमीनपुरा पुसद यांची दुचाकी क्र.एम.एच.२९-एसी-६४८४, शुभम सुनील भागणे रा. माळीगल्ली कळमनुरी यांची दुचाकी क्र.एम.एच-३८-६६९३, शेख रसूल शेख नादीम रा. जमजम कॉलनी परभणी यांची दुचाकी क्र.एम.एच.२२-एई-७३०५ पोलिसांनी जप्त केल्या आहे. आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

Web Title: Two gangs of two-wheeler gangs in the town of Pausal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.