कळंबजवळ दोन कार अपघातात १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:12 IST2018-07-18T22:12:00+5:302018-07-18T22:12:17+5:30
परस्पर विरूद्ध दिशेने निघालेल्या कारची टक्कर होऊन १२ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथून जवळच असलेल्या चापर्डा गावाजवळ घडली.

कळंबजवळ दोन कार अपघातात १२ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : परस्पर विरूद्ध दिशेने निघालेल्या कारची टक्कर होऊन १२ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास येथून जवळच असलेल्या चापर्डा गावाजवळ घडली.
यवतमाळहून राळेगावकडे निघालेली एम.एच.२९/एडी-२६२२ व कळंबहून यवतमाळकडे जात असलेली एम.एच.१४/पी-२९०० या क्रमांकाची कार या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये श्यामकांत येनुरकर, ओम श्यामकांत येनुरकर, वेदांत येनुरकर, रामू उरकुड, शोभा ठाकरे, महेश पोटजावळे, अकिल सरूडे, सदाशिव सरूडे, अंजली धुमाळ, प्रशांत येनुरकर, प्रेमिला येनुरकर, चिंधुजी नरूले हे जखमी झाले. सर्व जखमींना वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.