‘जेडीआयईटी’ला दोन पुरस्कार

By Admin | Updated: August 10, 2015 02:07 IST2015-08-10T02:07:53+5:302015-08-10T02:07:53+5:30

स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Two awards for JDIET | ‘जेडीआयईटी’ला दोन पुरस्कार

‘जेडीआयईटी’ला दोन पुरस्कार

यवतमाळ : स्थानिक जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाला दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वांद्रे येथे झालेल्या ‘लोकमत नॅशनल एज्यूकेशन अवॉर्ड’ सोहळ्यात आऊटस्टँडिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (पश्चिम विभाग) आणि बेस्ट इन्स्टिट्यूट इन इव्हेंट या पुरस्काराने या संस्थेला सन्मानित करण्यात आले आहे.
आऊटस्टँडिंग इंजिनिअरिंग इंस्टिट्यूट हा पुरस्कार निकाल, संशोधन, प्लेसमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेला दिला जातो. संस्थेचा विस्तृत परिसर, महाविद्यालयातील डिजीटल क्लासरूम, वाय-फाय सुविधा, डिजीटल कॉलेज अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह सिस्टीम, सुसज्ज ग्रंथालय, बायोमेट्रिक सुविधा, सीसीटीव्ही संव्हेलन्स, अनुभवी प्राध्यापक आदी बाबी विचारात घेवून हा पुरस्कार दिला जातो.
हाच पुरस्कार प्रभागामध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी नागपूर, व्हीजेटीआय मुंबई, गव्हर्नमेंट कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अमरावती, आर्मी इंस्टिट्यूट कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे, पिंपरी चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे यांनाही देण्यात आला आहे. जेडीआयईटीला दुसरा पुरस्कार बेस्ट इन्स्टिट्यूट इन इव्हेंटमध्ये मिळाला आहे. संस्थेत गतवर्षी झालेल्या सहा राष्ट्रीय परिषद, सहा कार्यशाळा, ३६ तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर, युफोरिया-सोशल गॅदरिंग, गणेशोत्सव, फ्रेशर्स गेट-टू-गेदर, ग्रॅज्युएशन सेरेमनी, फेअरवेल इव्हेंट आदीसाठी मिळाला. हा पुरस्कार राष्ट्रीयस्तरावर आलेल्या सर्व नामांकनामधून फक्त जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला मिळाला आहे. संस्थेचे संगणक विभाग प्रमुख प्रा. जितेंद्र सातुरवार यांनी पुरस्कार स्वीकारला. संस्थेच्या या यशाबद्दल अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य अविनाश कोल्हटकर यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Two awards for JDIET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.