शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात कोरोना चाचणी प्रयोगशाळा व अद्ययावत रूग्णालयासाठी अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:00 IST

यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले.

ठळक मुद्देपालकमंत्री संजय राठोड यांनी खनिज विकास निधीतून दिली मंजूरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने यवतमाळ जिल्ह्याची केंद्र शासनाने रेड झोनसह हॉट स्पॉट म्हणून नोंद घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना संसर्ग पसरू नये व संशयित नागरिकांची कोरोना चाचणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने व्हावी म्हणून ५०० खाटांचे अद्ययावत रूग्णालय व प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. त्यासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या निधीतून तत्काळ अडीच कोटी रूपयांचे अनुदान मंजूर केले.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १० वर गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली. यामुळे कोरोना संसगार्साठी जिल्हा अतिसंवेदनशील ठरला. हा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन सर्वतोपरी खबरदारी घेत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये व त्यांच्यावर तातडीने उपचार करता यावे, यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या आणि मुलींच्या नवीन वसतीगृहाचे रूपांतर ५०० खाटांच्या अद्ययावत रूग्णालयात करण्याचा निर्णय पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात घेण्यात आला. या रूग्णालयात कोरोनाबाधितांवर औषधोपचार, चिकित्सालयीन साहित्य, स्वच्छताविषयक बाबी, विविध किट्स, रसायने व आवश्यक साधनसामग्रीकरीता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून तातडीने एक कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. यामुळे भविष्यात अशा रूग्णांवर अद्ययावत उपचार करणे सोईचे होणार आहे.याशिवाय सध्या करोना संशयितांचे अहवाल तपासणीकरीता नागपूर येथे पाठवावे लागतात. हे अहवाल विलंबाने प्राप्त होत असल्याने प्रशासन आणि रूग्ण दोघांचाही जीव टांगणीला लागतो. ही अडचण जाणून घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच करोना चाचणी करण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेस दिशा निर्देश करून करोनाबाधित व संशयितांची तपासणी करण्याकरीता व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लेबॉरेटरी (व्हीआरडीएल) उभारण्याचा निर्णय घेतला. या सुसज्ज प्रयोगशाळेकरीता प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून दीड कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून प्रयोगशाळेकरीता लागणारी आवश्यक यंत्रसामग्री व साहित्य खरेदी केले जाणार आहे. अनुक्रमे एक आणि दीड कोटींच्या या दोन्ही निधींच्या वितरणाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष एम.डी. सिंह यांनी प्रशासकीय मान्यता देऊन आदेश निर्गमित केले.कोरोना विरोधात लढाईस बळ पालकमंत्री संजय राठोडकोरोना विरोधात लढाई लढण्यासाठी यंत्रणेस बळ मिळावे आणि येथील रूग्णांची वैद्यकीय सुविधांअभावी गैरसोय होऊ नये म्हणून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण निधीतून या सुविधा उपलब्ध करून दिल्या. येत्या आठवडाभरात ५०० खाटांचे हे रूग्णालय व कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSanjay Rathodसंजय राठोड