वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:51 IST2017-09-18T00:51:29+5:302017-09-18T00:51:40+5:30

वर्षभरापूर्वी नागपूर-हैद्राबाद मार्गावर ट्रक चालकाचा गळा चिरून खून करून पसार असलेल्या दोन आरोपींना एसपींच्या विशेष पथकाने मुंबई येथे अटक केली आहे.

 The two accused, who were absconding from the year, were arrested in Mumbai | वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक

वर्षभरापासून फरार असलेल्या दोन आरोपींना मुबंईत अटक

ठळक मुद्देखुनाचा आरोप : एसपींच्या विशेष पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वर्षभरापूर्वी नागपूर-हैद्राबाद मार्गावर ट्रक चालकाचा गळा चिरून खून करून पसार असलेल्या दोन आरोपींना एसपींच्या विशेष पथकाने मुंबई येथे अटक केली आहे. एप्रिल महिन्यातील यातील तिघांना नागपूरात अटक केली होती.
नीरज उर्फ पिल्लू विजय खले व शेख फारूक शेख हारून दोघे रा. पांढरकवडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. त्यांनी कुख्यात सादीक अब्दूल गफ्फार याच्या मदतीने वडकीजवळ ट्रक चालकाची गळा चिरून हत्या केली होती. रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. सर्व आरोपी सराईत असल्याने पोलिसांना वारंवार चकमा देत होते. एसपीच्या विशेष पथकाने या आरोपींचा माग काढून पाचही जणांना अटक केली. निरज खवले हा डायमंड गार्डन चेंबूर येथे पिझ्झा सेंटरमध्ये काम करत होता. तर शेख फारूक हा तुर्भे येथे राहत होता. या दोघांचा माग काढून १२ तासाच्या फरकाने दोनही आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनात सैयद साजीद, अजय डोळे, सहायक फौजदार अजय ढोले, वासुदेव साठवने, नितीन इंगोले, रुपेश पाली, प्रदीप नाईकवाडे, योगेश डगवार, सायबर सेलचे सुमीत पाळेकर, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे यांनी केली.

Web Title:  The two accused, who were absconding from the year, were arrested in Mumbai