बारावीत ग्रामीण विद्यार्थिनी चमकल्या
By Admin | Updated: May 31, 2017 00:27 IST2017-05-31T00:27:21+5:302017-05-31T00:27:21+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.

बारावीत ग्रामीण विद्यार्थिनी चमकल्या
घाटंजीतील तीन शाळा १०० टक्के पास : आर्णी, बाभूळगाव, राळेगाव, कळंब, नेर, दारव्हा तालुक्याचे उज्ज्वल यश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांचे निकाल १०० टक्के लागले आहे.
घाटंजीत तीन शाळा १०० टक्के
घाटंजी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा तालुक्याचा निकाल ८५.६७ टक्के लागला. यात तीन शाळांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेल्या १७७३ पैकी १५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांमध्ये एसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय घाटंजी, श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय घाटंजी, श्री स्वामी समर्थ कनिष्ठ महाविद्यालय शिवनीचा समावेश आहे. एसपीएम गिलाणी आर्ट-कॉमर्स कॉलेजचा निकाल ८३.७० टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ६६.३३, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय पांढुर्णा(बु) ८१.५७, दिवंगत किशनसिंग सिद्धू कनिष्ठ महाविद्यालय राजुरवाडी ८४.२१, मंजी नाईक कनिष्ठ महाविद्यालय किन्ही ९०.७८, शासकीय आश्रमशाळा जांब ९१.४२, शामाप्रसाद मुखर्जी कनिष्ठ महाविद्यालय घोटीचा निकाल ९३.३३ टक्के लागला.
मोवाडा येथील दिवंगत प्रेमसिंग राठोड कनिष्ठ महाविद्यालयाने ८३.८७ टक्के निकाल दिला आहे. बा.दे. पारवेकर उच्च माध्यमिक विद्यालय पारवा ९२.५३, शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय पार्डी(न) ८६.६६, जिजाऊ माध्यमिक आश्रमशाळा खापरी ९४, संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव ६६.६६, श्री संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कोळी ६१.७६, श्री स्वामी समर्थ ज्युनिअर कॉलेज कला शाखा शिवनी ८३.८७, एस. पाटील निकोडे कनिष्ठ महाविद्यालय पार्डी(न) ८१.१३, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय ताडसावळी ६८.४२, शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय घाटी ९२.८७, ए.एम. पटेल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय चिखलवर्धा ७७.७७, एसपीएम कनिष्ठ महाविद्यालय घाटंजी ९२, तर एसपीएम गिलाणी कला व वाणिज्य महाविद्यालय घाटंजी ८७.५० टक्के निकाल लागला आहे.
आर्णीचा निकाल ९१ टक्के
आर्णी : तालुक्याची बारावीच्या निकालाची टक्केवारी ९०.९७ एवढी आहे. २१ उच्च माध्यमिक विद्यालयांमधून परीक्षा दिलेल्या १७८३ विद्यार्थ्यांपैकी १६२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेचा समावेश आहे. महंत दत्तराम भारती कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तालुक्यातील महाविद्यालयांचे निकाल असे आहेत. श्री गुरुदेव विद्या मंदिर जवळा ९७.९६ टक्के, महंत दत्तराम भारती कन्या विद्यालय ९८.२७, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय सावळी ८८.१, शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय लोणबेहळ ८६.२०, जिल्हा परिषद हायस्कूल लोणी ९५.४५, सदाशिव भागवत उच्च माध्यमिक विद्यालय म्हसोला ८७.८७, राष्ट्रीय उच्च माध्यमिक शाळा लोणी ९१.८६, शिवरामजी मोघे विजाभज उच्च माध्यमिक शाळा हेटी ९४.८४, हाफिज बेग उर्दू ज्युनिअर कॉलेज आर्णी ९३.३३, सजनीबाई आडे विजाभज उच्च माध्यमिक विद्यालय महाळुंगी ९६, नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय केळझरा ७५, अमरसिंग नाईक कनिष्ठ महाविद्यालय जवळा ९५.६५, देवराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय आर्णी ९३.९३, मातोश्री लक्ष्मीबाई जोशी उच्च माध्यमिक विद्यालय बोरगाव ७३.३३, शहीद भगतसिंग विद्यालय आर्णी ९२.६६, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुकळी ७०.२७, उच्च माध्यमिक विद्यालय सेवादासनगर ९५.५५, गणपतराव पाटील उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिकणी ८९.८३, देवराव पाटील शिंदे कनिष्ठ महाविद्यालय आर्णी ९२.६६, गुरुदेव विद्या मंदिर जवळा ५८.८२ टक्के,
बाभूळगाव तालुक्याचा निकाल ८३.३८ टक्के
बाभूळगाव : तालुक्याचा बारावीचा निकाल ८३.३८ टक्के लागला आहे. कला, वाणिज्य, विज्ञान व व्होकेशनल शाखांमधून परीक्षेस बसलेल्या १२५८ विद्यार्थ्यांपैकी १०४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. चार विद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे. सर्वात कमी ४२.८५ टक्के निकाल घारफळ येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजचा (व्होकेशनल) लागला आहे.
शाळानिहाय निकाल असा आहे एमसीव्हीसी ज्युनिअर कॉलेज दाभा ७२.०१ टक्के, प्रताप विद्यालय बाभूळगाव ६७.४४, श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज घारफळ ५०.८३, मातोश्री नानीबाई घारफळकर विद्यालय बाभूळगाव ८८.४२, मदनेश्वर आश्रमशाळा मादणी ९२.९२, शिवशक्ती ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव ९४.२०, तथागत ज्युनिअर कॉलेज कोटंबा ९८.३, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय चिमणा बागापूर ९६.६६, केजीएन उर्दू ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव ८६.६६, माणिकराव पांडे उच्च माध्यमिक विद्यालय बाभूळगाव ६५.२१ टक्के.
मातोश्री नानीबाई घारफळकर महाविद्यालय (विज्ञान शाखा), शिवशक्ती ज्युनिअर कॉलेज बाभूळगाव (वाणिज्य शाखा), स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय चिमणा बागापूर (विज्ञान शाखा), संत तुकाराम ज्युनिअर कॉलेज राणी अमरावती (कला शाखा) या महाविद्यालयांनी १०० टक्के निकाल दिला आहे.
राळेगावचा निकाल ७७ टक्के
राळेगाव : बारावीच्या परीक्षेचा तालुक्याचा निकाल ७६.३६ टक्के लागला. परीक्षेस बसलेल्या १२१८ विद्यार्थ्यांपैकी ९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी ११० असून प्रथम श्रेणीत ६०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. डॉ. विराणी कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तालुक्यातील शाळांचे निकाल असे आहे - न्यू इंग्लिश ज्यूनिअर कॉलेज राळेगाव ६८.५७, कला-वाणिज्य महाविद्यालय राळेगाव ८८.७३, गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव ८२.७, लखाजी