प्रयत्न करा, भाग्य बदलेल

By Admin | Updated: July 2, 2015 02:53 IST2015-07-02T02:53:27+5:302015-07-02T02:53:27+5:30

शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही.

Try, luck will change | प्रयत्न करा, भाग्य बदलेल

प्रयत्न करा, भाग्य बदलेल

जिल्हाधिकारी : शेतकऱ्यांशी साधला संवाद
यवतमाळ : शेतकऱ्यांनी शेतीवरच विसंबून न राहता जोडधंद्यावर भर द्यावा. यामुळे दुष्काळाची कुठलीही चिंता राहणार नाही. प्रयत्न करा, भाग्य बदलेल, असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिला. ते बुधवारी शेतकऱ्यांशी कृषी दिनानिमित्त मुक्त संवाद साधत होते.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव नाईक यांचा जीवनपट, कृषीविषयक योजनांची माहिती, कापूस लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन, जैविक खते आणि नियंत्रकाचा वापर, शाश्वत शेती या विषयांवर यावेळी कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विजय राठोड (नागपूर), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकणी, कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह अनेकजण मंचावर उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कलशेट्टी म्हणाले, हा संपूर्ण आठवडा कृषी सप्ताह म्हणून साजरा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी विशद केली. (शहर वार्ताहर)

Web Title: Try, luck will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.