गुजरातच्या कंपनी विरोधात रणशिंग
By Admin | Updated: August 4, 2014 23:59 IST2014-08-04T23:59:06+5:302014-08-04T23:59:06+5:30
गुजरातच्या इन्फोटक कंपनीने सेतुचे कंत्राट यवतमाळात घेतले. सेतुकेंं द्र उघडण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या होत्या. मात्र ह्या निविदा कधी निघाल्या याची माहिती कुणालाही नव्हती.

गुजरातच्या कंपनी विरोधात रणशिंग
यवतमाळ: गुजरातच्या इन्फोटक कंपनीने सेतुचे कंत्राट यवतमाळात घेतले. सेतुकेंं द्र उघडण्यासाठी निविदा बोलविण्यात आल्या होत्या. मात्र ह्या निविदा कधी निघाल्या याची माहिती कुणालाही नव्हती. त्यामुळे केवळ एकाच गुजरात कंपनीला टेंडर देण्यात आले. या कंपनीने मनमानी करीत कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू केली आहे. याविरोधात ९ आॅगस्ट ह्या क्रांती दिनापासून आंदोलन छेडले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गत १० ते १२ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काढले. त्यातील तीन ते चार कर्मचाऱ्यांना दोन हजार रूपये महिन्यावर ठेवले. यात उदरनिर्वाह कसा होणार, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुलाखतीत कंपनीने गुजराती भाषेत प्रश्न विचारून गुजरातीत उत्तर मागितल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनीचा हा प्रकार पिळवणुकीचा आहे. आम्हाला अर्जनविस म्हणून काम करू द्यावे. लेखी अर्ज स्वीकारावे अशी मागणी अर्जनविसांनी केली आहे. यावर ९ आॅगस्टपर्यंत तोडगा न निघाल्यास क्रांती दिनापासून आंदोलन छेडण्याचा इशारा अर्जनविसांसोबत सेतू कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला किशोर नरांजे, रवी डेरे, श्रीकृष्ण हलमारे, कृष्णा परिपगार, कमलाकर खोब्रागडे, रवि डहाके, शिवानंद भगत, विश्वनाथ मुसळे आदि उपस्थित होते. (शहर वार्ताहर)