शारदा चौकात ट्रकचा थरार
By Admin | Updated: August 1, 2015 03:39 IST2015-08-01T03:39:27+5:302015-08-01T03:39:27+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने रस्त्यावरील तीन कुत्र्यांना चिरडत, किराणा दुकानाची टपरी फरपटत नेत एका घराला घडक दिली.

शारदा चौकात ट्रकचा थरार
रात्रीची घटना : टपरीला उडवून ट्रक शिरला घरात
यवतमाळ : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रकने रस्त्यावरील तीन कुत्र्यांना चिरडत, किराणा दुकानाची टपरी फरपटत नेत एका घराला घडक दिली. ही थरारक घटना येथील शारदा चौकात गुरूवारी रात्री १०.३० वाजता अनेकांनी अनुभवली. सुदैवाने यात कोणतही जीवितहानी झाली नाही.
नांदेड येथून पांढरकवडाकडे जात असलेला ट्रक (एमएच^-०५ बीडी ७००७ ) भरधाव वेगाने जात असताना शारदा चौकातील राजू भाऊरावजी सहारे यांच्या किराणा दुकानाची टपरीला धडक देऊन घरावर धडकला. सुदैवाने यात कोणाला इजा झाली नाही.
मात्र हे दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. वस्तीतील वर्दळीच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने हा ट्रक जात होता. या घटनेत तब्बल तीन लाखाचे नुकसान झाल्याचे राजू सहारे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)