दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळला

By Admin | Updated: September 7, 2015 02:20 IST2015-09-07T02:20:06+5:302015-09-07T02:20:06+5:30

दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले.

The truck collided with the bike and the truck collapsed in the river | दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळला

दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळला

घाटंजी : दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास लगतच्या खापरी गावाजवळ वाघाडी नदीच्या पुलावर घडला. अपघातात ट्रकचा चुराडा झाला.
भगवान गणपत पाटील (५३), रमेश महादेव आत्राम (४२) रा.किनवट आणि शुभम अशोक देठे (२४) रा. खापरी अशी जखमींची नावे आहेत. एम.एच.२६/एच-७६१६ हा ट्रक नागपूरहून वीज तारा घेऊन घाटंजी मार्गे किनवटकडे निघाला होता. खापरी येथील पुलावर या ट्रकची एम.एच.२९/ई-४४४८ या दुचाकीला धडक बसली.
नियंत्रण सुटल्याने ट्रक नदीत कोसळला. यात दोघे जण जखमी झाले. त्यांना यवतमाळ येथे, तर दुचाकीस्वारास नागपूर येथे हलविण्यात आले.
अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The truck collided with the bike and the truck collapsed in the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.