ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

By Admin | Updated: November 19, 2015 03:10 IST2015-11-19T03:10:52+5:302015-11-19T03:10:52+5:30

भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

A truck collided with a bike and killed one | ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

ट्रकवर दुचाकी आदळून एक ठार

पुसद : भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पुसद-माहूर मार्गावरील पिंपळगाव सूत गिरणीजवळ घडली.
साहेबराव लोडबाजी डवले (६८) रा. विठाळा वार्ड पुसद असे मृताचे नाव आहे. तर मनीष आत्राम (३५) रा. विठाळा वार्ड पुसद असे जखमीचे नाव आहे. सेवानिवृत्त विद्युत कर्मचारी असलेले साहेबराव डवले आणि मनीष आत्राम हे दोघेही दुचाकीने मंगळवारी पुसदवरून गुंजला गेले होते. रात्री परत येत होते. ९.३० वाजताच्या सुमारास बाबासाहेब नाईक सहकारी सूत गिरणी पिंपळगावजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी जाऊन आदळली. त्यात साहेबराव जागीच ठार झाले. तर मनीषच्या डोक्याला दुखापत झाली. त्याला पुसदच्या रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: A truck collided with a bike and killed one