शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पर्यायी पिकांच्या शोधात लुटारूंची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 9:58 PM

पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत.

ठळक मुद्देकंपन्यांची बनवाबनवी : दरांच्या अनिश्चिततेने जिल्ह्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रात चढ-उतार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. मात्र, कापसावर प्रक्रिया करणारे उद्योगच या ठिकाणी नाही. यामुळे कापूस दरातील चढउताराचा फटका दरवर्षी शेतकऱ्यांना सहन करावा लागतोे. शेतकरी आता कापसाला पर्यायी पिकांच्या शोधात आहेत. या पिकाला प्रोत्साहन देणारी मंडळी उत्पादन निघताच पसार होते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. अशा स्थितीत ठोस पर्यायी पिकांचा शोध अजूनही शेतकऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही.जिल्ह्यात नऊ लाख पाच हजार हेक्टर एवढे खरिपाचे लागवड क्षेत्र आहे. पूर्वी यातील ८० टक्के भाग हा कापसाचा होता. उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले. हे क्षेत्र आता निम्यावर आले. त्यातही २०१७ मध्ये गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांनी २०१८ मध्ये कापसाचे क्षेत्र कमी केले. लागवड क्षेत्र घटताच कापसाच्या दरात वाढ झाली. ही वाढ शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. हंगाम संपल्यानंतर कापसाचे दर तेज झाले. यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच झाला.येणाऱ्या हंगामात कापसाचा चांगला दर लाभेल म्हणून कापसाचे क्षेत्र पुन्हा वाढण्याचे संकेत मिळाले आहे. मात्र दरात स्थिरता नसते. यामुळे निम्मे क्षेत्र इतर पिकांच्या लागवडीखाली राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोेयाबीन आणि तुरीचा समावेश आहे.पर्यायी पीक खरेदी करणारी यंत्रणाच नाही२००५ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. त्यात सोयाबीनमध्ये यश मिळाले. मात्र साबुदाना, सफेद मुसळी, सुंगधी तेल, जेट्रोफा, केसरच्या नावाखाली दिलेली करडी यासारखे अनेक पिके शेतकऱ्यांनी लावली. नाविन्यपूर्ण लागवडीखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरपर्यंत चढले होते. दरवर्षी यात शेतकऱ्यांना वाईट अनुभव आल्याने या क्षेत्रात घसरण होेत आहे. हे क्षेत्र ११ हजार हेक्टरपर्यंत खाली आले आहे. अशा पर्यायी पिकांच्या खरेदीसाठी कुठलीही यंत्रणा नाही. या क्षेत्राला संरक्षण मिळाले तरच शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोग पुढे जातील. नाविन्यपूर्ण प्रयोगातील हळद आणि रेशिम ही दोनच पिके टिकलेली आहे. इतर पिकांचे क्षेत्र मात्र शून्य झाले आहे. लागवडीच्या वेळी कंपन्या शेतकऱ्यांना आश्वासन देते. मात्र पीक काढणीला येण्याच्या सुमारास कंपन्यांचे प्रतिनिधी पसार होतात. विशेष म्हणजे, फसवणूक करणाºयांचा थांगपत्ता लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा नव्या पिकावरील विश्वास घटत आहे.हळद, रेशीम, पाषणभेदहळद, रेशीमचे प्रयोग यशस्वी झाले. त्याचे मार्केट जिल्ह्यात मिळत नाही. यामुळे शेतकरी परजिल्हा अथवा परप्रांतातच विक्री करण्यास पसंती देतात. पाषाणभेदची लागवड काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्याच्या उत्पादनाचा उतारा अजूनही शेतकऱ्यांना समजला नाही.

टॅग्स :agricultureशेती