बाणगाव येथे वीर जवानांना श्रद्धांजली

By Admin | Updated: November 2, 2016 00:59 IST2016-11-02T00:59:08+5:302016-11-02T00:59:08+5:30

‘अगर सरहदों पे मेरे जवानों की पहरेदारी न होती तो यकिन मानो मेरे दोस्त किसी की भी दिवाली न होती’

Tribute to the brave soldiers in Banagaon | बाणगाव येथे वीर जवानांना श्रद्धांजली

बाणगाव येथे वीर जवानांना श्रद्धांजली

नेर : ‘अगर सरहदों पे मेरे जवानों की पहरेदारी न होती तो यकिन मानो मेरे दोस्त किसी की भी दिवाली न होती’ अशा भावपूर्ण शब्दात अनिल महाराज चव्हाण यांनी भारतीय वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली. निमित्त होते, बाणगाव येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रद्धांजली कार्यक्रमाचे.
शहिदांना श्रद्धांजलीनंतरच दिवाळी साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यानुसार प्रत्येक घरातून एक दिवा सेवादास महाराज मंदिरात आणण्यात आला. दिव्यातून ‘भारत माँ के वीर जवान, तुझे कोटी कोटी सलाम’ असे अक्षरं साकारण्यात आले.
याप्रसंगी संजय चव्हाण, परमानंद आडे, दिनकर राठोड, प्रवीण चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ते नोकरीनिमित्त इतर ठिकाणी वास्तव्याला आहे. सणानिमित्त गावात आले होते. बाणगाव येथे असलेल्या सर्व नऊ तांड्यातील नायकांचीही उपस्थिती होती. लालसिंग चव्हाण, सुधाकर राठोड, प्रल्हाद चव्हाण, बाबाराव राठोड, सरदार पवार, श्रीराम राठोड, माधवराव राठोड, तुकाराम राठोड, दिवाकर चव्हाण, नील राठोड, अरुण महाराज, तेवीचंद महाराज, अशोक शेंदुरकार, गोपीचंद आडे, वसराम राठोड आदी उपस्थित होते.
सरपंच विद्याताई इंगोले यांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शविली. उपसरपंच माधव राठोड यांनी यावेळी चारोळी सादर केली. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय जवान - जय किसान, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणांनी गाव दणाणून गेले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tribute to the brave soldiers in Banagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.