आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे उपसचिवांना मारहाणीचा निषेध
By Admin | Updated: April 6, 2016 02:34 IST2016-04-06T02:34:15+5:302016-04-06T02:34:15+5:30
ग्रामविकास विभागाचे उपसचिव बी.आर. गावीत यांना मारहाणीचा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे निषेध नोंदवून ...

आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे उपसचिवांना मारहाणीचा निषेध
यवतमाळ : ग्रामविकास विभागाचे उपसचिव बी.आर. गावीत यांना मारहाणीचा आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे निषेध नोंदवून आमदार बच्चू कडू यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यालयीन काम करत असताना उपसचिव गावीत यांच्या कामकाजात अडथळा आणला. त्यांना मारहाणही करण्यात आली.
त्यामुळे आमदार कडू यांच्यावर कारवाई करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करताना आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, जिल्हाध्यक्ष गुलाबराव कुडमेथे, आदिवासीसेवक शालिकराव परचाके, पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कुमरे, पवन आतराम, प्रमोद घोडाम, प्रल्हाद सिडाम, प्रा.हरीश धुर्वे, शंकर कोटनाके, किशोर उईके, गजानन कोटनाके, अभिमन्यू धुर्वे, ओंकार मडावी, राजू कुडमेथे, वैभव मसराम, किसन किनाके, विजय गेडाम, बाळकृष्ण मेश्राम, गजानन इळपाते, बी.एम. मेश्राम, एम.डब्ल्यू. परचाके आदी उपस्थित होते. (वार्ताहर)