शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

आदिवासी बांधवांनी संघटितपणे पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:11 AM

सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे थाटात उद्घाटन; भारतरत्न, बिरसा भवनासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वाधिक प्रामाणिक आणि शांतताप्रिय समाज म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. त्यांच्या सोडवणुकीसाठी एक अजेंडा तयार करून त्याचा सतत पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन संघटितपणे पुढे येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केले.स्थानिक समता मैदानावर शनिवारी दोन दिवसीय राज्यस्तरीय बिरसा पर्वाचे उद्घाटन झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात मोघे बोलत होते. उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, बिरसा मुंडा यांचे नातू सुकराम आणि सानिक मुंडा होते. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार डॉ.संदीप धुर्वे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासूदेवशाह टेकाम, आॅल इंडिया फेडरेशनचे केंद्रीय कार्याध्यक्ष सुरेश कन्नाके, पणन महासंघ संचालक सुरेश चिंचोळकर, पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजूदास जाधव, शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक उद्धवराव येरमे, आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक मिनाक्षी वेट्टी, राजू केराम, पवन आत्राम उपस्थित होते.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, देशभरात ३० नोव्हेंबरपर्यंत बिरसा पर्व साजरे केले जाणार आहे. लोकसभेत बाबूराव शेडमाके यांचे तैलचित्र लावण्याचा ठराव घेण्यात आला आहे.डॉ. संदीप धुर्वे यांनी बिरसा मुंडा यांना मरणोपरांत भारतरत्न देण्याची मागणी केली. नगराध्यक्ष कांचन चौधरी म्हणाल्या, बिरसा मुंडा यांचा पुतळ्यासाठी जागा सुचविण्यात यावी. सुकरामजी मुंडा यांनी अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.सत्ताधारी आमदारांवर आयोजकांची सरबत्तीआदिवासींचे २५ आमदार विधानसभेत आहे. तरीही आदिवासींचे प्रश्न सुटले नाही, अशी खंत बिरसा पर्व उत्सव समितीचे अध्यक्ष राजू चांदेकर यांनी मांडली. गैरआदिवासींना संरक्षण दिल्या जात असल्याच्या मुद्यावर रोष व्यक्त केला. कुमारी माता प्रकरणात दोषींना फाशी द्यावी. मात्र कुमारी मातांना केवळ मदतीवर समजावले जात असल्याची खंत व्यक्त केली.