लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन सादर केले. वेळेत उपाय योजना न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.नगरपरिषद आरोग्य विभागाच्या सफाई कामात सातत्याने अनागोंदी सुरू आहे. वारंवार निवेदन व आंदोलन करूनही करभार सुधारण्यास तयार नाही. ऐन पावसाळ््यात शहरातील कचरा उचलण्याचे काम सातत्याने प्रभावीत होत आहे. नगरपरिषदेकडे डम्पींग यार्ड नाही, ही समस्या २०१६ पासून निर्माण झाली आहे. त्यामुळे दैनंदिन कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. बेकायदेशीररित्या शहरालगतच्या खुल्या जागेत, बायपासवर, महामार्गावर दुतर्फा हा कचरा टाकला जात आहे. यामुळे गल्लीबोळातही कचरा जमा झाला आहे. कचºयाचे नियोजन करण्याबाबत नगरसेवकांनी वारंवार सर्वसाधारण सभेत विषय मांडला. त्याला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशिल असलेल्या या विषयावर जिल्हाधिकाºयांनी सुध्दा कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचºयाचे ढिग लागले आहे. नगरपरिषदेत सुरू असलेल्या बेकायदेशीर कार्यास प्रतिबंद घालावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.निवेदन देताना नगरसेवक गजानन इंगोले, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, दिनेश गोगरकर, दर्शना इंगोले, विशाल पावडे, नितीन बांगर, चैताली बेलोकार, संगीता राऊत, पल्लवी रामटेके, पंकज देशमुख, वैशाली सवाई, उध्दवराव साबळे, सपना लंगोटे, वैशाली कनाके, प्रा. अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
यवतमाळ शहरातील कचराकोंडी फोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 21:46 IST
नगपरिषदेचे नियोजन कोलमडले असून यवतमाळातील कचरा कोंडी काही केल्या सुटण्यास तयार नाही. यामुळे त्रस्त नगरसेवकांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे साकडे घातले आहे. सोमवारी १५ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध मागण्याचे निवेदन सादर केले. वेळेत उपाय योजना न झाल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा या नगरसेवकांनी दिला आहे.
यवतमाळ शहरातील कचराकोंडी फोडा
ठळक मुद्देनगरसेवकांचे साकडे : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन