पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षकांच्या बदल्या
By Admin | Updated: May 22, 2015 00:24 IST2015-05-22T00:24:49+5:302015-05-22T00:24:49+5:30
जिल्हा परिषदेचे बुधवारपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ सहायक आणि विस्तार अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या.

पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षकांच्या बदल्या
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे बुधवारपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ सहायक आणि विस्तार अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी दुपारनंतर पशु संवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.
बदली प्रक्रिया ही समूपदेशनाने केली जात असून पशुसंवर्धन विभागातील एक बदली समायोजनाने, एक आपसी, तीन प्रशासकीय बदल्या आणि दोन विनंती बदल्या करण्यात आल्या. सहायक पशुधन पर्यवेक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पात्र कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार दिला. तर काही बदलीस पात्र नव्हते. त्यामुळे या संवर्गातील एकही बदली झाली नाही.
बुधवारी सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिकाच्या प्रशासकीय ३८, विनंती १२, वरिष्ठ सहायकांच्या प्रशासकीय १२, विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तीन, आपसी आणि विनंती प्रत्येकी एक बदली करण्यात आली. शुक्रवारी बांधकाम विभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे.
या बदली प्रक्रियेकडे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)