गणेशोत्सवातील दगडफेकीनंतर ठाणेदाराची बदली
By Admin | Updated: October 17, 2016 21:25 IST2016-10-17T21:25:22+5:302016-10-17T21:25:22+5:30
या घटनेला जबाबदार ठरवित उमरखेड ठाणेदार अनिल पाटील यांची १८० किलोमीटरवरील बाभूळगाव (जि.यवतमाळ) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली

गणेशोत्सवातील दगडफेकीनंतर ठाणेदाराची बदली
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १७ : राज्यात सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडला असताना केवळ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये त्याला गालबोट लागले. तेथे विसर्जन मिरवणुकीवर विशिष्ट समाजाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेला जबाबदार ठरवित उमरखेड ठाणेदार अनिल पाटील यांची १८० किलोमीटरवरील बाभूळगाव (जि.यवतमाळ) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यादव यांनी नुकतीच दगडफेकीची दखल घेवून उमरखेडला भेट दिली होती, हे विशेष. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी पाटील यांच्याशिवाय अन्य पाच पोलीस ठाण्यांमध्ये फेरबदल केले आहे. काही महिन्यांपूर्वीच उमरखेडला गेलेल्या अनिल पाटील यांना गणेशोत्सवातील दगडफेकीचा फटका बसला. बाभूळगाव ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांची उमरखेडमध्ये झालेली नियुक्ती पाहता त्यांची राजकीय मोर्चेबांधणी यशस्वी ठरल्याचे दिसते.