एस.टी.च्या आणखी ४५ संपकरी कर्मचाऱ्यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST2021-12-09T05:00:00+5:302021-12-09T05:00:11+5:30
महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १२० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३०१ कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली.

एस.टी.च्या आणखी ४५ संपकरी कर्मचाऱ्यांची बदली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परिवहन महामंडळाने बुधवारी ४५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली, तर सलग तिसऱ्या दिवशी १९ एस.टी. बसेस धावल्या. या बसमधून ५०२ प्रवाशांनी बुधवारी प्रवास केला.
महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १२० वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३०१ कर्मचारी निलंबित झाले आहेत, तर १०४ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली.
गत महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या एस.टी. बससेस बंद आहेत. कर्मचाऱ्यांंनी पुन्हा कामावर यावे म्हणून परिवहन महामंडळ शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र, यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. यातील काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होत आहे. यातून एस.टी. बसेस सुरू करण्यात आल्या आहे. बुधवारी पांढरकवडा आगारातून ७ बसेस, वणी ७, यवतमाळ ३ आणि नेरमधून एक एस.टी.बस धावली आहे. या एस.टी. बसमधून ५०२ कर्मचाऱ्यांनी प्रवास केला. कारवाईची ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. यासोबत एस.टी.च्या बसफेऱ्या वाढविण्यावरही परिवहन महामंडळ काम करणार आहे. येत्या काही दिवसांत एस.टी.चे चित्र आशादायी असणार आहे.
निलंबित चालकाने दुचाकीने पाठलाग करून फोडली एसटी बस
- नेर : दुचाकीने पाठलाग करत निलंबित चालकाने दगड मारून एसटीच्या काचा फोडल्याचा प्रकार बुधवारी दुपारी ४ वाजता मांगलादेवी येथे घडला. अविनाश मडकाम असे या चालकाचे नाव आहे. नेर आगाराची बस (क्र. एमएच ४० वाय ५७९४) बाभूळगाव येथून नेरकडे परतत असताना डेहणी येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली. या ठिकाणी अविनाश मडकाम याने बसचे चालक रूपेश गिऱ्हे, वाहक हरिश राय यांना आगारातून बस कशी काढली, अशी विचारणा केली. तेथून बस नेरकडे निघताच मडकाम याने दुचाकीने पाठलाग केला. मांगलादेवी येथे या बसला दगड मारून काचा फोडल्या.
- वणी : पाटणवरून वणीकडे परत येत असलेल्या बसवर मानकीलगत अज्ञात इसमाने दगडफेक केली. यात बसच्या समोरच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वी यवतमाळवरून वणीकडे येणाऱ्या बसवर करंजी येथे दगडफेक करण्यात आली होती. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. यात बसचे १० हजारांचे नुकसान झाले.