वाहतूक पोलिसाचा हृदयाघाताने मृत्यू

By Admin | Updated: March 1, 2017 01:26 IST2017-03-01T01:26:03+5:302017-03-01T01:26:03+5:30

शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच छातीत तीव्र वेदना होऊन वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला.

Traffic police death due to heart attack | वाहतूक पोलिसाचा हृदयाघाताने मृत्यू

वाहतूक पोलिसाचा हृदयाघाताने मृत्यू

यवतमाळ : शहरातील वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडत असतानाच छातीत तीव्र वेदना होऊन वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. दीपक हरिभाऊ चांदोरे (५२) रा. चांदोरेनगर यवतमाळ असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर मोहा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळ माणिकवाडा (धनज) येथील रहिवासी असलेले दीपक चांदोरे हे पोलीस विभागात दाखल झाले. विविध विभागात कार्यरत असतानाच त्यांना वाहतूक शाखेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांच्या मागे आई रमाबाई, पत्नी अनिता, मुलगा अनुप, मुलगी अश्विनी व मोठा आप्त परिवार आहे.
दीपक चांदोरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत २४ फैरी झाडून मानवंदना दिली. जिल्हा वाहतूक शाखेतर्फे दिलीप चव्हाण यांनी पुष्पचक्र वाहून पोलीस विभागातर्फे श्रद्धांजली वाहिली. स्मशानभूमीत निरंज होले, चव्हाण, सुभाष परोपटे, अशोक केवटे, ज्ञानेश्वर गोबरे, विजय बुचे, सुभाष नवरे आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Traffic police death due to heart attack