भरधाव ट्रॅक्टर उलटला, चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST2021-06-06T04:30:44+5:302021-06-06T04:30:44+5:30

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिवळणी ईजारा घाटात विटा घेऊन येणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. त्यात चालक जागीच ...

The tractor overturned, killing the driver on the spot | भरधाव ट्रॅक्टर उलटला, चालक जागीच ठार

भरधाव ट्रॅक्टर उलटला, चालक जागीच ठार

पुसद : तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिवळणी ईजारा घाटात विटा घेऊन येणारा भरधाव ट्रॅक्टर उलटला. त्यात चालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर राठोड, रा. गुंज, ता. महागाव असे मृत चालकाचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा एम.एच.२९/३२२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये विटा घेऊन भरधाव वेगाने पुसद तालुक्यातील हिवळणी ईजारा येथे जात होता. घाटात त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की चालकाचे डोके व संपूर्ण शरीर ट्रॅक्टरच्या हेडखाली आल्याने ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. खंडाळा पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार गोपाळ चावळीकर यांनी पोलिसांना तत्काळ घटनास्थळी रवाना केले.

Web Title: The tractor overturned, killing the driver on the spot