शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कुलकॅनच्या अप्रमाणित पाण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:22 IST

जिल्ह्यात कुलकॅनमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली विकले जात आहे.

ठळक मुद्देमानवी आरोग्याशी खेळ : फुकटच्या पाण्यातून कोट्यवधींची उलाढाल, तक्रार कुठे करावी हा प्रश्नच

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कुलकॅनमध्ये पाणी विकण्याचा गोरखधंदा गल्लीबोळात सुरू असून कोणत्याही नियमाचे पालन न करता अप्रमाणित पाणी ‘शुद्धते’च्या नावाखाली विकले जात आहे. या गोरखधंद्याला भीषण पाणीटंचाईने सुगीचे दिवस आले आहे. शुद्ध आणि अशुद्धतेचा विचार न करता ग्राहक कुलकॅन घेऊन आपली तहान भागवित आहे. यातून मानवी आरोग्याशी खेळ सुरू असून प्रशासनासह आरोग्य विभागाचेही याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.उन्हाळ्यातच नव्हे तर बाराही महिने कुलकॅनमधील पाणी विकण्याचा व्यवसाय अलिकडच्या काळात तेजीत आला आहे. प्रत्येक जण आरोग्याला जपत असल्याने शुद्ध पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. हॉटेल, पानटपरी यासह पाणपोईवरसुद्धा कुलकॅनद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाते. थंडगार असणारे पाणी शुद्धच असेल या मानसिकतेतून कोणताही विचार न करता प्रत्येक जण पाणी पित आहे. मात्र या मागील वास्तविकता अतिशय भीषण आहे.कुलकॅनचा व्यवसाय करताना कुठलेही मापदंड पाळले जात नाही. इतकेच काय तर यवतमाळ शहरात शेकडोच्या घरात असे वॉटर प्लांट ठिकठिकाणी आहेत. विहीर, बोअरवेल आणि टंचाई काळात टँकरचे पाणी घेऊन कुलकॅनच्या नावाखाली विकले जात आहे. विशेष म्हणजे कुलकॅनमधील पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करणे गरजेचे असते. मात्र अशा कोणत्याही मापदंडाचा विचार केला जात नाही. पाणी थंड व नितळ केले की ते थेट १५ ते २० लिटरच्या कॅनमध्ये भरले जाते. वाहनाद्वारे घरपोच सेवा दिली जाते. एका कॅनमागे ३० ते ३५ रुपये घेतले जातात. यवतमाळ शहराचा विचार करता दररोज हजारो कॅन नागरिकांची तहान भागवित आहे. जिल्ह्यात प्रत्येक मोठ्या गावातही असे प्लांट लावण्यात आले आहे. या फुकटच्या पाण्यावर कोट्यवधींची उलाढाल करण्याचा हा धंदा आता तेजीत आहे.अन्न व औषधी प्रशासन म्हणते, आमचा विषय नाहीकुलकॅनसाठी तयार होणारे पाणी आणि त्याची विक्री हे अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत मोडत नाही. आमच्याकडे पॅकेज वॉटर संदर्भातच तपासणी व परवाना देण्याचे अधिकार आहे. कुलकॅन ही लुज पॅकिंगमध्ये मोडल्या जाते. त्यामुळे त्यावर आमचे कुठलेही नियंत्रण नाही. साधा गुस्माता परवाना घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. शिवाय नगरपरिषद आरोग्य विभाग व ग्रामीण आरोग्य विभागाने अशा प्लांटच्या पाणी शुद्धतेची तपासणी करणे क्रमप्राप्त असल्याचे अन्न प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांनी सांगितले.प्लांटची नगरपरिषदेकडे नोंदच नाहीयवतमाळात सद्यस्थितीत किती कुलकॅन प्लांट कार्यरत आहेत, याची साधी माहिती नगरपरिषदेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाकडे नाही. हा प्रकारच आपल्या अखत्यारीत येतो याचीही जाण येथील अधिकाऱ्यांना नाही. यामुळे तपासणी, गुणवत्ता नियंत्रण हा सर्व सोपस्कार, कोसोदूर आहे. टंचाई काळात पाण्याचा व्यापार करणाºया कुलकॅन प्लांटधारकांकडून अक्षरश: मानवी आरोग्याशी खेळ सुरू आहे.आयएसआय मानकासाठी एफडीएची परवानगीजिल्ह्यात केवळ सहा प्लांटलाच भारतीय मानक ब्युरो (आयएसआय) परवानगी दिली आहे. त्यांचीच नोंदणी व तपासणी अन्न व औषधी विभागाच्या अखत्यारीत येते. विशेष म्हणजे या ठिकाणचे पाणी पॅकेजड् असणे आवश्यक आहे. हे पाणी तयार करताना त्या प्लांटवर यु.व्ही. स्टेरियालझेशन, मायक्रो फिल्टरेशन, ओझनायझेशन सयंत्र असणे गरजेचे आहे. ही यंत्रणा असेल तरच पॅकेज वॉटर विकता येते. मात्र यवतमाळ शहरात कुलकॅनसाठी असे कोणतेही मापदंड वापरले जात नाही.

टॅग्स :Waterपाणी