मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:14 IST2019-07-18T22:14:02+5:302019-07-18T22:14:20+5:30

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे.

Today's program for the commemoration of Matoshri Veena Devi Darda | मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम

ठळक मुद्देप्रेरणास्थळावर आदरांजली सभा : गुरूद्वारा सिंग सभेचे मुख्त्येयार सिंगजी यांचे कीर्तन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने कामठी रोड, नागपूर येथील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहचारिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, १९ जुलै रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या वेळात आदरांजली सभेचे आयोजन स्थानिक प्रेरणास्थळ येथील मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळी करण्यात आले आहे.
यानिमित्त नागपूरस्थित कामठी रोडवरील गुरूद्वारा सिंग सभेचे पाई मुख्त्येयार सिंगजी (पुणावाले) यांचे कीर्तन होणार आहे. मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाजाभिमुख जीवनकार्याला उजाळा दिला जाणार आहे. आदरांजली अर्पण करण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Today's program for the commemoration of Matoshri Veena Devi Darda