‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:43 IST2017-11-25T00:41:43+5:302017-11-25T00:43:32+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा आज २० वा स्मृतिदिन. त्यांच्या पावन स्मृतिंना विनम्र अभिवादन !

‘प्रेरणास्थळ’ येथे आज संगीतमय प्रार्थना सभा
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचा आज २० वा स्मृतिदिन. त्यांच्या पावन स्मृतिंना विनम्र अभिवादन !
यवतमाळ - स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त शनिवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० या वेळात ‘प्रेरणास्थळ’ येथे संगीतमय प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळातील प्रतिथयश गायक आणि वाद्यवृंद बाबूजींना संगीतमय आदरांजली अर्पण करतील. तसेच यवतमाळच्या ऐतिहासिक हनुमान आखाड्यात बाबूजींच्या स्मृतिदिनानिमित्त २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता इनामी काटा कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्ल सहभागी होणार असून या दंगलीत दहा लाखांच्या बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे.